Breaking News

नांदगावमध्ये बंधार्यात अडकले झाड

बंधारा नादुरुस्त होण्याची भीती

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील नांदगाव येथे नाणी नदीमधील कोल्हापूर पद्दतीच्या बंधार्‍यात मोठे झाड अडकले आहे.त्यामुळे सिमेंट बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे. तसेच बंधार्‍यात पाणी साचून राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने झाडांचे ओंडके बंधार्‍याबाहेर काढण्याची आवश्यकता आहे.

सह्याद्रीच्या नाणे घाटात उगम पावणारी नाणी नदी भीमाशंकर अभयारण्यामधून कर्जत तालुक्यात येते. या नदीच्या पाण्याबरोबर अभयारण्यातील झाडे वाहत येत असतात. यावर्षी नाणी नदीला आलेल्या पूराच्या पाण्याबरोबर वाहात आलेले एक मोठे झाड कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील कोल्हापूर पद्दतीच्या बंधार्‍यात अडकून पडले आहे. या झाडाच्या ओंडक्यांचा आकार एवढा मोठा आहार की तो बंधारा वाहून नेऊ शकतो. या झाडामुळे बंधार्‍यात पाणी अडविण्यासाठी लावाव्या लागणार्‍या लोखंडी पट्ट्यादेखील लावता येणार नाही. त्यामुळे पाणी अडवणे कठीण झाले आहे.

उन्हाळ्यात या बंधार्‍यातील पाणी जनावरांसाठी वापरले जाते. परिसरातील आदिवासी बांधव धुणीभांडी करण्यासाठी या बंधार्‍यातील पाण्याचा वापर करतात. झाड बाहेर काढले नाही तर बंधार्‍यात पाणी साठणार नाही. त्यामुळे बंधार्‍यात अडलेले झाड ग्रापंचायतीने बाजूला काढले पाहिजे.

-प्रदीप गोरे, ग्रामस्थ, नांदगाव, ता. कर्जत

बंधार्‍यात अडकलेल्या झाडाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या आहेत. पाऊस कमी झाल्यावर बंधार्‍यात अडकून पडलेले झाड बाहेर काढण्याचे ग्रामपंचायतीने नक्की केले आहे.

-राम खांडवी, सदस्य, नांदगाव ग्रामपंचायत, ता. कर्जत

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply