नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2020) 13व्या मोसमावरही अनिश्चिततेचे सावट आहे. म्हणून आता आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा सहभागही अनिश्चित मानला जात आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळेत ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयने जुलै-सप्टेंबरचा पर्याय शोधला आहे, परंतु त्यात परदेशी खेळाडूंचा किती सहभाग असेल यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या 13व्या मोसमात खेळतील, याची शक्यताही मावळण्याच्या वाटेवर आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ऑस्ट्रेलियन नागरिकांना परदेशात जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग प्रश्नात्मक झाला आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांवर लेव्हर फोर वॉर्निंग देण्यात आली आहे. त्यांना परदेशात प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, परंतु त्याचा अर्थ त्यांच्यावर परदेश दौर्याची बंदी असा नाही. ऑस्ट्रेलियन सरकारने सांगितले की, जर कोणाला प्रवास करायचाच असेल, तर त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सल्ला घ्यावा. कदाचित तुमच्या प्रवास विमा पॉलिसीत कोरोना व्हायरसचा समावेश नसावा. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन सरकार काहीच मदत करू शकत नाही.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …