खारघर ः रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर कॉलेज, खारघर यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार (दि. 28) एकदिवशीय प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयस्तरीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण, सामाजिक व भविष्यातील स्वयंउद्योजकीय कौशल्यधारित डीएलएलई हा उपक्रम आहे. या विभागात एक वर्ष सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांना अतिरिक्त 10 गुणांबरोबरच व्यक्तिमत्व विकासाला प्रधान्य मिळते. नवी मुंबईतील 30 महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी व क्षेत्र समन्वयक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस. टी. गडदे व उपप्राचार्य शरदकुमार शहा यांनी उपस्थितांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे व मुंबई विद्यापीठ अंतर्गत डी.एलएलई विभागाचे समन्वय्क डॉ.कुणाल जाधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची धुरा सांभाळली. क्षेत्रसमन्वयक डॉ. बी. एस. पाटील व डॉ. चक्रदेव यांनी विविध प्रकल्पावरिल माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रित थुले, महाविद्यालयासंदर्भात सविस्तर माहिती प्रा. करिश्मा पाटील यांनी दिली व विभागाचे समन्वयक प्रा. महेश धायगुडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. मिनल मांडवे, प्रा. श्रदधा शिंदे, प्रा. स्नेहा चोगले, प्र्र्रा. अंकिता दुबे व प्रा. गणेश कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …