Breaking News

वेतन फरकाची रक्कम द्या

जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे वेतन अधीक्षकांना साकडे

मुरूड : प्रतिनिधी

माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात दिली जाणारा आहे, त्यापैकी पहिला  हप्ता हा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघातर्फे वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांच्याकडे गुरुवारी (दि. 21) करण्यात आली.  

रायगड जिल्हा माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे  अध्यक्ष आशिष पारसनीस, सचिव नितीन ठाकूर, सहसचिव नरेंद्र पाटील, खजिनदार विशाल जगे यांनी गुरुवारी वेतन अधीक्षक रुपाली सावंत यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या वेळी वेतन अधीक्षकांना  निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी सहावा वेतन आयोगातील अर्धवेळ ग्रंथपालांचा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निघणार्‍या फरकासंदर्भात चर्चाही केली. 

शासनाकडून अनुदान प्राप्त होताच सर्वप्रथम ग्रंथपालांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, त्यांना फरकाची रक्क्म त्वरित अदा करण्यासाठी माझे प्रयत्न असतील तसेच इतर प्रश्नाबाबतसुद्धा ग्रंथपाल संवर्गाला सहकार्य करण्यात येईल, आश्वासन वेतन अधीक्षक रुपाली  सावंत यांनी या वेळी दिले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply