Breaking News

गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक

भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल ग्रामीण मंडळ अंतर्गत गव्हाण जिल्हा परिषद समितीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे रविवारी (दि. 28) झाली. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते. या वेळी गव्हाण जिल्हा परिषदेच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी गव्हाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी अमर म्हात्रे, सरचिटणीसपदी निलेश खारकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले, तसेच उलवे नोड 1 महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी समृद्धी अडसुळे, सरचिटणीसपादी गीता ठाकूर आणि चिटणीसपदी संगीता कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गव्हाण जिल्हा परिषद समितीच्या वतीने संघटनात्मक काम करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष योगिता भगत, चिटणीस एम. डी. खारकर, पंडित म्हात्रे, नंदा ठाकूर, ज्येष्ठ नेते विठ्ठल ओवळेकर, उलवे नोड 1 महिला मोर्चा अध्यक्ष निकिता खारकर, उलवे नोड 2 सरचिटणीस आशा म्हात्रे, कैलास गोंधळी, शैलेश भगत, दीपक गोंधळी, रवींद्र शिंदे, राजेश खारकर, दिलीप कोळी, साईचरण म्हात्रे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply