पनवेल ः रामप्रहर वृत्त
मातृभाषा आपल्या हृदयातील, तर राष्ट्रभाषा देशाच्या सन्मानाची भाषा आहे. त्यामुळे भाषा कोणतीही असो तिच्याबद्दल अभिमान प्रत्येकाला असतो आणि तो असलाच पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) येथे केले.
ज्येष्ठ पत्रकार विजय कडू संपादित दै. वादळवारा, प्रवीण मोहोकर संपादित दीपस्तंभ, राज भंडारी संपादित क्रांतिकारी भूमी, विशाल मनोहर सावंत संपादित माझं पनवेल, क्षितिज कडू संपादित रायगड टुडे, विशाल रावसाहेब सावंत संपादित रायगड संदेश, आप्पासाहेब मगर संपादित जनसभा, साहिल रेळेकर संपादित दीपोत्सव, प्रवीण कोळआपटे संपादित यशोभूमी, दीपिका पाटील संपादित उरण समाचार या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रकाशन सोहळ्यास नगरसेवक अजय बहिरा, दै. वादळवाराचे संस्थापक दा. चां. कडू, संपादक विजय कडू, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत पाटील, विजय घरत, वामन कडू, युवा नेते समीर कदम, महेश साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दीपक महाडिक, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, रत्नाकर पाटील, दीपक घोसाळकर, हरेश साठे, नितीन कोळी, मयूर तांबडे, भरतकुमार कांबळे, रवींद्र गायकवाड, चंद्रकांत शिर्के, असीम शेख, संतोष व्हावळ, जयेश गोगरी, दिलीप कडू, अनिल भोळे, अनिल राय, जितेंद्र नटे, सुमेधा लिम्हण, बाळाराम केदारी, प्रदीप डुकरे आदी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हटले की, आधुनिकीकरणाच्या युगात जग झपाट्याने बदलल्याने जलदगतीचे विश्व निर्माण झाले आहे. असे असले तरी साहित्य परंपरेच्या संस्कृतीला अबाधित ठेवण्यासाठी वाचन साहित्य आणि त्या अनुषंगाने निर्मित होणार्या दिवाळी विशेषांकांनी साहित्य संस्कृती वृद्धींगत करण्याचे काम केले आहे. दिवाळीत इतर कोणत्याही वस्तूंच्या बरोबरीने दिवाळी अंकांची खरेदी करणे आणि या उत्साही वातावरणाचा पुरेपूर आनंद घेत दिवाळी अंकांचे मनसोक्त वाचन केले जाते. त्यामुळे अनेक प्रकारची संकटे आली तरी त्यात खंड पडला नाही. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …