नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षीही कायम ठेवणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशेरात जवानांबरोबर गुरुवारी (दि. 4) दिवाळी साजरी करणार आहेत.
गेले महिनाभर राजौरी आणि जवळच असलेला पुंछ परिसर धुमसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा राजौरी दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. देशाचे नेतृत्व सोबत असल्याचे सांगत जवानांचे मनौधर्य वाढविण्याचा प्रयत्न मोदी करणार आहेत.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …