Breaking News

हायवेवरील बॅनर्स धोकादायक

खोपोली : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्यमार्गावर जाहिरातींचे लावलेले बॅनर्स जीवितहानी अथवा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. मुंबई-पुणे महामार्गावरील चौक हद्दीतील कर्जत फाटा येथे बॅनर लावण्यासाठी अनेक लोखंडी स्ट्रक्चर उभे आहेत. त्यातील एका स्ट्रक्चरवरील बॅनर पूर्णपणे फाटून तो हवा येईल तसा लटकून फिरत आहे. त्यामुळे तो कधी तुटेल व कुठे पडेल हे सांगता येत नाही, मात्र त्यामुळे हानी मात्र नक्की होईल. कर्जत फाटा येथे लावलेला बॅनर सुमारे 300 ते 400 चौरस फुटांचा आहे. मुंबई-पुणे महामार्ग वर्दळीचा असून, स्ट्रक्चरच्या खालच्या बाजूस इको रिक्षा स्टँड आहे. या स्ट्रक्चरच्या दोन्ही बाजूस बसस्टँड, रिक्षास्टँड व हॉटेल आहेत. हा चौक वर्दळीचा आहे. येथे लावलेले बॅनर जीवितहानी अथवा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहेत. मोठमोठ्या कंपन्यांची जाहिरात, सेलिब्रिटी किंवा शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स लावले जातात. ते लावल्यानंतर किती दिवसांनी काढावेत हे निश्चित नाही किंवा ज्यांनी लावले त्यांची अथवा हे स्ट्रक्चर ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply