Breaking News

…अन् पालीतील भिंती झाल्या बोलक्या!

मूक व कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकरने चितारले प्राणी-पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील पालीमधील मोकळ्या, जर्जर व खराब झालेल्या भिंती आता आकर्षक, विलोभनीय आणि प्रबोधनात्मक संदेश देणार्‍या झाल्या आहेत. मूक आणि कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकर याने प्राणी, पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश चितारून या भिंतीना बोलके केले आहे. ग्रामस्थ तसेच  भाविक, पर्यटकांसाठी या कलाकृती आकर्षण ठरत आहेत.

अष्टविनायकांपैकी पाली हे एक धार्मिक स्थळ आहे. नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या संकल्पनेतून पालीतील पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र आणि इतर कार्यलयाच्या संरक्षक भिंतीवर आकर्षक चित्रे व एकात्मतेचे आणि प्रबोधनात्मक संदेश देणारी चित्रे काढण्याचे काम सुरू आहे. या भिंतीवर वाघ, सिंह, हरीण, कुत्रा, धीवर आदि पक्षी व प्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. याबरोबरच वृक्ष संवर्धन, सामाजिक, धार्मिक एकात्मता व आरोग्य संदेश देणारी आकर्षक चित्रे, कोरोनाबाबत जनजागृती करणारी, शासनाच्या योजना व कामे आदींची माहिती या भिंतींवर चित्रित केली आहेत. ही चित्रे येथील चित्रकार चेतन पाशीलकर काढत आहे.

चेतन पाशीलकर कर्णबधिर व मुके आहेत. ते जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांची पत्नी आरती पाशीलकर या डिजिटल पेंटिंगद्वारे स्टोरी बोर्ड तयार करतात, तसेच कन्सेप्ट बनवितात आणि चेतन त्याद्वारे चित्रे साकारतात. अशा प्रकारे चेतन यांना आरती या कामात मदत करीत आहेत. पालीतील विविध ठिकाणच्या भिंतींवर शास्त्रज्ञ व क्रांतिवीर यांची चित्रे व कामे, गडकिल्ले, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय नेते आदी चित्रेदेखील साकारण्यात येणार आहेत.

पाली शहरातील संरक्षक भिंतींचा वापर प्रबोधनात्मक संदेश व जनजागृती करण्यासाठी आणि परिसर स्वच्छ व आकर्षक करण्यासाठी केला जाणार आहे.

-दिलीप रायन्नावार, प्रशासक, पाली नगरपंचायत, ता. सुधागड

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply