Breaking News

‘इपीएफओ’चा व्याजदर ‘जैसे थे’ राहणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

केंद्र सरकारकडून पीएफच्या व्याजदरात कोणताच बदल केला जाणार नसून पीएफचा व्याजदर 8.55 टक्के राहण्याची शक्यता आहे. व्याजदरात कोणताच बदल केला नाही, तर देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) गुरुवारच्या बैठकीत याचा निर्णय होईल. किमान निवृत्ती वेतनात वाढ करून ती दुप्पट केली जाऊ शकते. बैठकीत यावर सहमती झाली तर इपीएफओच्या पेन्शन स्कीमचा सुमारे 50 लाख खातेधारकांना फायदा मिळेल. सीबीटीचे सदस्य प्रभाकर बानसुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सीबीटीच्या बैठकीपूर्वी एफआयएसीची बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफ व्याजदर किती राहील हे स्पष्ट होईल. या व्याजदरात बदल केली जाण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या व्याजदर हा 8.55 टक्के राहील. सीबीटी एक त्रिपक्षीय समिती आहे. यात सरकार, कर्मचारी, श्रम मंत्रालयाच्या कामगार संघटनांचे प्रमुख सहभागी होतात. इपीएफओचे सर्व महत्त्वाचे निकाल सीबीटीद्वारे घेतले जातात. यापूर्वी पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता असतानाही वर्ष 2019मध्ये सरकारची ही जास्त व्याज देणारी योजना बनेल. इतर सरकारी बचत योजनांवर व्याजदर 8.55 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply