माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने पनवेल चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे. या स्पर्धेत स्मित स्मॅशर्स संघाने विजेतेपद पटकाविले, तर अमल इलेव्हन संघ उपविजेता ठरला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पनवेल महापालिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानात ही दोन दिवसयीय क्रिकेट स्पर्धा रंगली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 7) झाला. या वेळी विजेत्या स्मित स्मॅशर्स संघाला 40 हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि उपविजेत्या अमल इलेव्हन संघाला 20 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास माजी नगरसेवक मुकित काझी, इक्बाल काझी, युवा नेते केदार भगत, राजू पटेल, सुफियान पटेल, अस्लम मास्तर, आतिफ मस्ते आदी उपस्थित होते.