कर्जत : बातमीदार
तालुक्यातील चिंचवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावामधील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 ग्रामस्थांनी घेतला.
बार्डी गावातील निखिल कोळंबे, हेमंत कोंडीलकर, जगदीश मुने, संभाजी धुळे, दर्शन दळवी, तेजस कांबरी या तरुणांनी गावातील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवली ग्रामपंचायत सदस्य दीपाली कांबरी, विश्वास नारायण लोभी, तसेच दर्शना पोपेटे, शरद कांबरी यांनी या शिबिराला भेट देऊन तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.