कर्जत : बातमीदार
नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. 2) सिद्धगड बलिदान दिन साजरा करण्यात आला. या वेळी हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला नेरळच्या सरपंच उषा पारधी यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी विद्यार्थ्यांनी समूहगीते सादर केली. प्रास्ताविक स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी, तर सूत्रसंचालन आसावरी काळे यांनी केले. रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएसएस अधिकारी बनलेले प्रतीक जुईकर आणि माथेरानच्या डोंगरात एका दगडामध्ये गणपती साकारणारे रेल्वेचे निवृत्त मोटरमन राजाराम खडे यांना या वेळी हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि झाडाचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दोन्ही सत्कारमूर्ती उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वतीने अनुक्रमे चंद्रशेखर जुईकर आणि नमिता खडे-पाटील यांनी पुरस्कार स्वीकारले. या वेळी नेरळचे उपसरपंच मंगेश म्हसकर, ज्येष्ठ कवी आणि संगीतकार अरुण म्हात्रे, जि. प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पं. स.च्या उपसभापती जयवंती हिंदोळा, माजी सभापती सुजाता मनवे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नेरळ ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे, उमा खडे, गीतांजली देशमुख कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार एस. आर. बाचकर, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, तसेच अंकुश दाभणे, बल्लाळ जोशी, अंकुश शेळके, भगवान चव्हाण, सुधाकर देसाई, भाऊ क्षीरसागर, प्रभाकर देशमुख, विवेक पोतदार, सूर्यकांत जाधव, प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, मुख्याध्यापिका विनया काकडे, अरविंद कटारिया, किसन खडे, किशोर घारे, अर्जुन तरे, बुधाजी हिंदोळा, जैतू पारधी, अनुराधा भडसावळे,शांताराम पळसकर आदींसह नेरळ ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
महामार्गाला नाव देण्याची मागणी
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548अ यास हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे नाव देण्यात यावे. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देण्यात आले, तर माथेरान घाटातील मिनीट्रेनच्या एनएम 134 ते कड्यावरचा गणपती या मार्गाला रेल्वे मोटरमन राजाराम खडे मार्ग असे नाव देण्याची मागणी हुतात्मा स्मारक समितीकडून करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, प्रेस क्लबचे माजी जिल्हा संघटक संजय मोहिते, जिल्हा खजिनदार दर्वेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष विलास श्रीखंडे, स्मारक समितीचे गणेश पवार, अजय गायकवाड, दीपक पाटील, ज्ञानेश्वर बागडे, अॅड. ऋषिकेश कांबळे, नितीन पारधी, सुमित क्षीरसागर, बंडू क्षीरसागर आदी उपस्थित होते.