Breaking News

बार्डी गावात ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर; 200 जणांनी केली नोंदणी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील चिंचवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बार्डी गावामधील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 ग्रामस्थांनी घेतला.

बार्डी गावातील निखिल कोळंबे, हेमंत कोंडीलकर, जगदीश मुने, संभाजी धुळे, दर्शन दळवी, तेजस कांबरी  या तरुणांनी गावातील अंगणवाडीत ई-श्रमकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. चिंचवली ग्रामपंचायत सदस्य दीपाली कांबरी, विश्वास नारायण लोभी, तसेच दर्शना पोपेटे, शरद कांबरी यांनी या शिबिराला भेट देऊन तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply