पुणे ः प्रतिनिधी
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शाह यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. शाह म्हणाले, पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. त्यांनी म्हटले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पण शिवसेना म्हणते सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही ती मिळवणारच. तुम्ही एकवेळ मुख्यमंत्री बनलात, पण मी म्हणतो हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा. तुम्हा तिनही पक्षांशी एकसाथ लढायला या भाजपचा कार्यकर्ता सज्ज आहे. महाराष्ट्राची जनताही हिशोब करायला तयारच आहे. अशा प्रकारचे सिद्धांतरहित राजकारण कोणत्याही राज्याच्या जनतेला मान्य नाही.