पनवेल ः वार्ताहर
विचुंबे येथील बौध्दवाडा येथे भारतीय जनता पक्ष व भीमगर्जना मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुवारी (दि. 5) रात्री 10 वाजता बौध्दाचार्य हिरामण गुरुजींचा पूजापाठ, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलन होणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख सल्लागार अनंताशेठ गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड व विचुंबे भावकी यांच्या वतीने केले आहे.