खालापूर : प्रतिनिधी
वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सहजसेवा फाउंडेशने रविवारी (दि. 19) खालापूर तालुक्यातील महडफाटा येथील एका वीटभट्टीजवळ झाडाच्या सावलीत शाळेचा शुभारंभ केला. दर रविवारी भरणार्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जाणार आहेत. नकुल देशमुख, इशिका शेलार व कांचन सावंत यांनी शिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. या निसर्ग शाळेचा शुभारंभ राजेंद्र फक्के, राजेश पाटील, मोहन केदार, नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी पुण्याच्या ध्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ पाटील, चैताली ढमाले, राहुल डेरेकर, अमोल चव्हाण तसेच अझीम कर्जिकर, आसिफ जळगावकर, आतिक मांडलेकर, आश्रफ जळगावकर, मौजम मांडलेकर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांला ओळखपत्र देण्यात आले. सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारची निसर्ग शाळा आपल्या विभागात सुरू करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन खालापूर तालुका वीटभट्टी संघटनेचे अध्यक्ष अझीम कर्जिकर यांनी यावेळी केले. टाटा स्टील, निलम पाटील, संतोष गायकर, आनंद शाळा खोपोली, शिशु मंदिर खोपोली, प्रदीप खंडेलवाल, ज्योती भुजबळ, लोहाना महाजन समाज, रोहित टिम्बर, राकेश ओसवाल, ठाकरे मेडिकल्स खोपोली यांचे या निसर्ग शाळेसाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच स्व.अनंता काशिनाथ मोरे यांच्या स्मरणार्थ नगरसेवक नितीन मोरे यांनी या शाळेला ओम्नी गाडी भेट दिली. सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, उपाध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, कार्यवाह बी. निरंजन, आफताब सय्यद, बंटी कांबळे, अखिलेश पाटील, जयश्री भागेकर यांनी निसर्ग शाळेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.