Breaking News

ऐश्वर्या, आराध्याह कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ‘बिग बी’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनाही संसर्ग झाला आहे, मात्र याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधी माहिती देऊन नंतर ते ट्विट डिलीट केल्याने ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply