मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई
खालापूर : प्रतिनिधी
कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसविणार्यांवर कारवाई करण्यासाठी खालापूर तहसीलदारांनी तपासणी पथके तयार केली असून, मास्क न वापरणार्या वाहन चालक, पादचारी यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे.
राज्य शासनाने कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्यांना सतर्क केले आहे. हॉटेल्स, मॉल, सार्वजनिक ठिकाणी बंधने लादण्यात आली असून अशा आस्थापनांना लेखी आदेश पारित केले आहेत. त्याचाच भाग म्हणून खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी तपासणी पथके तयार केली असून, खोपोली येथील वन विभाग कार्यालयासमोर तपासणी नाका सुरू केला. तेथे तलाठी भरत सावंत व त्यांचे सहकारी तसेच पोलीस प्रत्येक वाहन चालकांची तपासणी करीत आहेत. रिक्षा चालक, मोटारसायकल चालक तसेच बस व मोटार कार यांची तपासणी करून त्यांना प्रसंगी समज देत तर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.