कर्जत : प्रतिनिधी
अन्नदा संस्था मुंबई यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण आहार किट (पोषण पोटली) चे वाटप करण्यात येत आहे. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच मंगेश म्हसकर, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 29) झालेल्या कार्यक्रमात परिसरातील 170 कुपोषित बालकांना पोषण पोटलीचे वाटप करण्यात आले.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी अकराशे पोषण पोटली (किट) वाटण्यात येत आहेत. कुपोषित बालकांचे वजन वाढण्यासाठी त्यांना उपयुक्त आहार या पोषण पोटलीमध्ये आहे. हे किट मुंबईमधील अन्नदा संस्थेतर्फे देण्यात आले आहेत.