Breaking News

मराठा आरक्षण लढ्यातील शिलेदारांचा सत्कार

मोहोपाडा ः वार्ताहर

रसायनी पाताळगंगा परिसरातील श्री नाईक मराठा मंडळ तसेच सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्या शिलेदारांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने सत्कार व जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम गुळसुंदे येथील शिवमंदिरात करण्यात आला.

दि. 29 नोव्हेंबर रोजी विधिमंडळात  मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 58 मूक मोर्चे तर 42 जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करणारे समन्वयक विनोद साबळे व त्यांचे सहकारी यांचा यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे विभाग अध्यक्ष महादेव कचरे, सेक्रेटरी राजेंद्र दसवंते, नरेश गवस्कर, मनोज पवार, भरत राऊत, ह. भ. प. महादेव महाराज मांडे, अशोक  महाडिक, यांच्यासह  समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमास

उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply