पनवेल : रामप्रहर वृत्त
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे विद्यमान सदस्य जगदिश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) त्यांनी कामोठे येथे ‘भीमालय’ हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, नितीन पाटील, अॅड. मनोज भुजबळ, विजय चिपळेकर, अजय बहिरा, विकास घरत, बबन मुकादम, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा नेते हॅप्पी सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही या वेळी जगदिश गायकवाड यांचे अभीष्टचिंतन केले.