Breaking News

कोरोना रुग्णवाढ : महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष निर्देश

मुंबई : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहेे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्‍या आठ राज्यांना विशेष निर्देश दिले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून कोविड-19 चाचण्या वाढवण्याचा, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करण्याचा, लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने या राज्यांना पत्र लिहून सतर्क करीत तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply