पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटचे पत्रे बदलण्याचे तसेच फॉल सिलिंगचे काम 45 लाख 43 हजार रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात झाले.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, पंच कमिटीचे हरिचंद्र भगत, दत्ता पाटील, एकनाथ भोईर, प्रमोद भगत, तसेच आप्पा शिंदे आणि मंगेश पिलविळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, परेश ठाकूर यांनी मच्छी मार्केटची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.