Breaking News

स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहा -प्रा. वृषाली विनायक

अलिबाग : प्रतिनिधी

स्त्रीकडे स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. तिला जगण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जोपर्यंत समाजाची मानसिक प्रगती होत नाही तोपर्यंत स्त्रीला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली विनायक यांनी केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त कुरुळ आरसीएफ कॉलनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘21व्या शतकातील सावित्रीकडून जोतिबाच्या सावित्रीच्या अपेक्षा’ या विषयावरील व्याख्यानात प्रा. वृषाली विनायक बोलत होत्या. समाजाची मानसिक प्रगती करण्याचे काम घराघरातून झाले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला वानखेडे यांनी केले. सामाजिक कार्यकत्या प्रिया ढवळे, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर, अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, दादासाहेब खंडारे यांची या वेळी समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराधना गोलाईत यांनी केले. अलिबागमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारावेत, अशी मागणी प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी या वेळी केली. कविता खंडारे यांनी आभार मानले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply