Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माणगावात

भाजपतर्फे स्वागताची जोरदार तयारी

माणगाव : प्रतिनिधी

इंदापूर-दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी (दि. 3) इंदापूर-विघवली येथे येत असून, त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली.

प्रसार माध्यमांजवळ अधिक माहिती देताना संजयआप्पा ढवळे म्हणाले नामदार नितीन गडकरी  यांचे रविवारी दुपारी 3.30 वाजता विघवली (ता. माणगाव) येथील हेलिपॅडवर आगमन होणार असून त्यांच्यासमवेत रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण येणार आहेत. याठिकाणी इंदापूर-दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या दोन्ही रस्त्यांचे नामदार गडकरी हे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  माणगाव तालुका भाजपने जोरदार तयारी केली आहे.  या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply