Breaking News

पेण, माणगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील सावरसई येथील शासकीय व उच्च माध्यमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, जयसपाल सिंह मुडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुणे नीरा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक एच. एच. पाटील, सहशिक्षिका एम. जे. माने, सी. एम. म्हात्रे, जयश्री नाईक, सुभाष नाईक, आर. डी. पाटील, के. ए. बिराजदार, एल. एन. संताने, एम. जे. माने या वेळी उपस्थित होते.

माणगाव : प्रतिनिधी

येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूल अ‍ॅड ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये सोमवारी (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कोमसापच्या सदस्या सुलभाताई मदन निकम, माणगाव येथील सुयोग मतिमंद मुलांची शाळेच्या चेअरमन मीनाताई खाडे व त्यांच्या सुकन्या शिल्पा खाडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी शिक्षणाचे महत्त्व सांगणारे नृत्य सादर केले. प्राचार्या संगीता कोकाटे यांनी सावित्रीबाई फुले नसत्या, तर आजचे चित्र कसे असते यावर प्रकाशझोत टाकला. विभावरी जाधव यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला मुधाले यांनी केले. शाळेचे समन्वयक अधिकारी पाईकराव विजय, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शैलेश जाधव, स्नेहल परांजपे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply