पनवेल ः रामप्रहर वृत्त
महापौर सहाय्यता निधी अंतर्गत मंगळवारी (दि. 18) दोन लाभार्थ्यांना वैद्यकीय कारणास्तव 40 हजारांची मदत करण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील आणि सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
महापौर सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी, तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या लोकसहभागातून महापौर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले होते. यामधून तीन लाभार्थ्यांच्या सुमारे 65 हजारांच्या आर्थिक मदतीस मंजूरी देण्यात आली आहे.
महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी (कोविड19, हृदयरोग, मेंदू संबधित उपचार, तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबधित शस्त्रक्रिया, ल्युकेमीया, थॅलेसीमीया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो) आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरुपी दुखापत, कायमस्वरुपी अंपगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे.
महापौर निधीचा लाभ घेण्याकरिता महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील (वेबसाईटवरील) अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची सर्व माहिती या ठिकाणी आहे. हा अर्ज आणि त्यासोबत लागणारी कागदपत्रे महापालिकेला रिर्पींशश्रलेीिेीरींळेपसारळश्र.लेा या ई-मेलवर पाठवावी किंवा महापौर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …