आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी विभागीय कमिटीची आणि युवा मोर्चाची कार्यकारिणी सोमवारी (दि. 17)जाहीर झाली. यामध्ये भाजप खांदा कॉलनी अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि युवा मोर्चा अध्यक्षपदी अभिषेक भोपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भाजपच्या खांदा कॉलनीतील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष शांताराम महाडीक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप प्रभाग क्रमांक 15 खांदा कॉलनी विभागीय अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड, कार्याध्यक्षपदी जितेंद्र माने, सरचिटणीसपदी संजय कांबळे, भीमराव पोवार, उपाध्यक्षपदी नितीन विचारे, प्रकाश खानावकर, सचिन मोरे, सचिन गायकवाड, चिटणीसपदी प्रवीण भोसले, नामदेव कोरे, संतोष लोटणकर, मच्छिंद्र वर्तक, खजिनदारपदी राजू महापूरकर, सदस्य म्हणून दीपक जांभळे, प्रवीण वर्तक, अंकुश खरमाटे, सुहास पाटील, चेतन जाधव, नामदेव मुळीक, युवराज बेंडसे, देवानंद म्हात्रे, तानाजी करवीर, मिथुन दर्गे, जितेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्षपदी अभिषेक भोपी, सरचिटणीसपदी रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, उपाध्यक्षपदी अनिकेत गायकवाड, शशिकांत इंगळे, निलेश घाडगे, सचिवपदी राहुल कांबळे, विनोद अडसुले, खजिनदारपदी कौस्तुभ कुडेकर, सदस्य म्हणून सचिन धोत्रे, हृषिकेश साबळे, आकाश सोनावणे, राहुल पोवार, अजिंक्य टेमकर, मिलिंद घाडगे, अभिराज म्हात्रे, हर्षल सावंत, सोहम कनगुटकर, जयराम फड, मयूर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.