पुणे : प्रतिनिधी
मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पक्ष पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 15) पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. तथापि महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजप सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरू केली, मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची निम्मी फी भरली व त्यासाठी 785 कोटी रुपये खर्च केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली. मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …