Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे उद्घाटन

उरण : वार्ताहर

उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, तालुका उपाध्यक्ष भूपेन घरत, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, महालन विभागीय अध्यक्ष महेश कडू, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, भाजप अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, रोहन भोईर, हितेश शाह, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply