Breaking News

तुकाराम हरी वाजेकर मार्ग नामफलकाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण

उरण : बातमीदार
श्रमजीवी जनतेचे नेते, उरणचे भाग्यविधाते स्व. तुकाराम हरी वाजेकर यांची 41वी पुण्यतिथी मंगळवारी (दि. 15) उरण पेठा मिठागर कामगार संघाच्या कोटनाका येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानंतर उरण शहरातील राजपाल नाका ते राघोबा मंदिर कोटनाका या रस्त्याचे तुकाराम हरी वाजेकर मार्ग असे नामकरण करण्यात येऊन या नामफलकाचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, तालुकाध्यक्ष व नगरसेवक रविशेठ भोईर, शहराध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजप व्यापारी सेलचे संयोजक हितेन शाह, निलेश पाटील, रोहित पाटील, जस्मिन गॅस यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, उरण पेठा मिठागर कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, उरण पेठा मीठ उत्पादक मंडळाचे अध्यक्ष महादेव बंडा, सीमा घरत यांच्यासह स्व. वाजेकर यांचे चाहते, नागरिक उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply