माणगाव : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम शेख यांची गुरुवारी (दि. 3) माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
माणगाव तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झाली. या सभेत संघाच्या नवीन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. त्यात निलेश म्हात्रे (उपाध्यक्ष), मजिद हाजिते (कार्याध्यक्ष), देवयानी मोरे (सचिव), नरेश पाटील (सहसचिव), स्वप्ना साळुंके (खजिनदार), आजेश नाडकर (प्रवक्ता) यांचा समावेश आहे.
कार्यकारिणी सदस्यपदी दीपक दपके यांची तर सल्लागार पदी डॉ. आरिफ पागारकर, सचिन देसाई, प्रभाकर मसुरे, नुरुद्दीन सनगे यांची निवड करण्यात आली आहे. इंडियन प्रेस क्लबच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. आरिफ पागारकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.