Breaking News

शिंपी समाजातर्फे आदिवासीवाडीत दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर

पनवेल येथील शिंपी समाज बांधवांतर्फे अलिबाग येथील बेलोशी-परळ वाडी येथील आदिवासी वाडीतील घराघरात जाऊन आदिवासी समाज बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी पनवेलचे संदीप शिंत्रे, मनीषा शिंत्रे, योगिता मांढरे, सुनील पोरे आणि एडवोकेट नागेश हिरवे हे उपस्थित होते.

महाड पूरग्रस्तांसाठी भरीव मदत केल्यानंतर शिंपी समाज बांधवांनी पुन्हा एकत्र येऊन दुर्गम अशा आदिवासी वाडीत जाऊन चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे असे एक किलोचे 40 पॅकेट बनवून त्याचे वाटप आदिवासी वाडीतील जाऊन केले. यासोबत लहान मुलांसाठी कपड्यांचे वाटप करण्यात आले आणि अशा प्रकारे 40 आदिवासी समाज बांधवांच्या कुटुंबासोबत पनवेल शिंपी समाजाने यावर्षीचा दिवाळी सण साजरा केला. ह्या उपक्रमाला यशस्वी करण्या साठी मदत करणार्‍या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply