Breaking News

उल्हास नदी संवर्धनांचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही तर नद्यांमधील जीव यांचे आयुष्य देखील प्रदूषित पाण्यात असलेल्या सर्वांचे कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हासनदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदी मध्ये होतो. ही नदी अनेक महानगरे आणि शहरांना तसेच गावांना पाणी पुरवठा करीत आहे, मात्र गेल्या काही वर्षात ही नदी प्रदूषणाकडे वाहत आहे. त्या जीवन वाहिनी असलेल्या नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक तरुण सरसावले आहेत. गतवर्षी सुरू झालेली उल्हास नदी संवर्धनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आता अभ्यास दौरे देखील होऊ लागले आहेत.

उल्हासनदी बचाव कृती समितीमार्फत नुकताच उल्हासनदी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या एक दोन वर्षांपासून प्रामुख्याने उल्हासनदीच्या संवर्धनासाठी आणि तिचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करण्यासाठी तरुण एकत्र आले होते. जो विषय गेल्या वर्षभरापासून विविध माध्यमातून लोकांपर्यत पोहचवत होते त्याबाबत सखोल अभ्यास करणे शक्य होणार होते. त्यामुळे एकदंर दोन दिवसीय या अभ्यास दौर्‍यात उल्हासनदीची ढासळत चाललेली प्रकृती, तेथील जलचर आणि जलपर्णी याबाबत सखोल माहिती एकत्रित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न सुरू झाला आहे. या अभ्यास दौर्‍यात कल्याण ते कर्जत परिसरातील पर्यावरण रक्षणासाठीची तळमळ असणारे 30-40 सदस्य सहभागी झाले होते. हे सर्व  सदस्य आपल्या परिने उल्हास नदी रक्षणासाठी विविध स्तरावर काम करत आहेत.

उल्हासनदीच्या माथ्यावर कोंढाणा लेणीच्या बाजूला असलेल्या गावापासून साधारण सात किलोमीटर पुढे उल्हासनदीचा उगम ज्या ठिकाणी झाला आहे तो भाग म्हणजे कातळदरा. हे कातळदरा म्हणजे राजमाची गोमुखातून पाण्याचा ओढा आणि लोणावळा-खंडाळा येथील सहयाद्रीच्या पर्वतरांगातून वाहत असलेल्या दोन ओढ्यांचा संगम होऊन पुढे मुळ प्रवाहात नदी पात्र निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. उमग स्थानात उल्हासनदीचे पाणी स्वच्छ आणि नितळ असल्याचे दिसून आले. तेथे त्यासाठी कोणत्याही प्रक्रियेशिवाय हे पाणी आपण पिऊ शकतो. कातळधारा या भागातून नदी पुढे खळखळत वाहत पुढे घनदाट रानावनातून खळखळत वाहत आहे. या ठिकाणी नदिकिनारी अनेक जलचर, तसेच पक्षी, प्राण्यांच्या विविध आवाजांनी हा परिसर अतिशय सुमधून आणि मनाला शांत करून जातो. नदिपात्रात विविध माशांच्या प्रजाती पहावयास मिळतात,तसेच शिंपळे हे पात्रात दिसून आले तर घनदाट झाडी असल्याने माकडे आदी प्राणी दिसून आले. ही नदी पुढे जसजसी सरकते किंवा तिचा प्रवाह जसा सुरू आहे तस तशी नदिच्या पात्राची धुप झाल्याचे आढळून आले. नदी पात्राला लागून असलेल्या वनस्पती हया आयुर्वेदीक उपचारासाठी मुबलक प्रमाणात उपयुक्त असल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात येत असते. उल्हासनदीचे पाणी किती प्रमाणात आणि कोणत्या भागात दुषित झाले आहे हे पाहण्यासाठी या अभ्यास दौर्‍यात सहभागी तरुण यांचा प्रवास दहा किलोमीटर वर पाण्याच्या रंगात, चवीत बदल झाल्याचे अनुभवास मिळत होते. अशा ठिकाणचे नमुने गोळा करण्यात आले आहेत जेणेकरून प्रदुषणाची पातळी किती तीव्र आहे, याचा अभ्यास शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येईल.

उल्हासनदीला अनेक  ऐतिहासिक, भौगोलिक, प्रादेशिक संदर्भ असून या पाण्यामुळे कित्येक कुटूंबाचे पोट भरत आहे. नदी किनारी अनेक भातशेती, फुलशेती, पालेभाजी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. या नदीला असलेल्या ऐतिहासिक वारसा यासाठी आहे. कारण 1656 साली याच उल्हासनदीवरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आरमार उभारले असल्याचे इतिहासकार यांचे म्हणणे आहे तसेच नदिकिनारी अनेक ठिकाणी शिवमंदिर, मारूती रायाचे मंदिर असल्याचेही दिसून येते.नदी प्रदुषणास मोठ्या प्रमाणात कारणीभूत असणारे घटक म्हणजे अनेक ठिकाणी किनार्‍यालगत मोठे रिसाँर्ट, हाँटेल्स, गृहप्रकल्प आणि लोकवस्ती वाढत असल्याने नदीपात्रात सांडपाणी सोडलेले दिसून आले. काही ठिकाणी नदिपात्रालगत डंपिंग ग्राऊडही आढळूण आले. उगमस्थानापासून ते रायता (कल्याण) ला ज्या ठिकाणी नदि खाडीत संगम होत आहे. नदीच्या प्रदुषणाबाबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने जे दाव्याला येत्या काळात आव्हान समितीमार्फत दिले जाईल. भिवपूरी येथून नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ आणि पुढे कल्याण ला समाप्त झाला. येत्या काळात जर या नदी प्रदुषणावर गांभिर्याने लक्ष दिले नाही, तर आपल्या खेडेगांवाना पिण्याच्या पाण्याचे महत्वाचे स्त्रोत असलेल्या उल्हासनदीचे गटारगंगेत रूपांतर होऊ नये असे जर वाटत असेल तर वेळीच जागे

होणे गरजेचे आहे.

कर्जत शहरात उल्हासनदी प्रदूषण सोबत नेरळ पर्यंत येथील तरुणांनी सुरू केलेली मोहीम ठाणे जिल्ह्यात पोहचली आहे. गेल्या काही वर्षात प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या बालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मोहिमेत अंबरनाथमधील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि सगुण रूरल फाऊंडेशनच्या मदतीने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जीआयपी धरणापासून स्वच्छता सुरू केल्यानंतर शिवमंदिराजवळ बंधारा बांधून त्यात जीवाणूंच्या मदतीने पाणी शुद्ध करण्याचा उपक्रमही यावेळी सुरू करण्यात आला. बदलापूर शहरातून उल्हासनगर आणि पुढे वाहणार्‍या आपल्या उल्हास नदीवरील जलपर्णीला हटवण्यात यश आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील प्रदूषित वालधुनी नदीच्या संवर्धनाचा प्रकल्प अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून या नदीच्या संवर्धनाची मागणी केली जात होती.अखेर अंबरनाथ नगरपालिकेचे ही मोहीम हाती घेण्यात आली असून येत्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत ही मोहीम चालवली जाणार आहे.वालधुनी नदीला सहा वेगवेगळ्या भागात विभागून नदीतील स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे.

रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जीआयपी धरणाजवळ स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी आणि शाळेचे विद्यार्थी यांचा सहभाग होता. उल्हास नदीची उपनदी असलेल्या वालधुनी नदीचे संवर्धन केले जात आहे. उल्हास नदीवर प्रभावी ठरलेल्या सगुण जलसंवर्धन तंत्राची माहिती सगुणा रूरल फाऊंडेशनचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आणि अंबरनाथ शहरातील पी. डी. कारखानीस महाविद्यालय, भगिनी मंडळ शाळेचे विद्यार्थी, पालिकेचे सफाई कर्मचारी युवा युनिटी फाऊंडेशन, वालधुनी जल बिरादरी, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील आणि पर्यावरणप्रेमी प्रदूषण झालेल्या नदीत उतरले. नदीतील कचरा काढून नदीचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. जीवाणूंना मदत व्हावी यासाठी वालधुनी नदीवर शिवमंदिराजवळ यावेळी एक मातीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधार्‍याजवळ साचणार्‍या पाण्यात प्राणवायूवर जगणारे जीवाणू सोडले जाणार आहे. त्यांच्या मदतीने पाणी शुद्ध होण्यास मदत होत असते. ही सगुणा जलसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून उल्हास नदी थेट कर्जत पासून कल्याणच्या खाडीपर्यंत टिटवाळापर्यंत जलपर्णी मुक्त झाली आहे. तेच तंत्र वालाधुनी नदीचे संवर्धन करण्यासाठी राबविले जात आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply