Breaking News

दापोलीत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अंतर्गत दापोली गावात स्थानिक  आमदार विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी त्यांनी ठेकेदाराला काम वेळेत व दर्जेदार करावे अशा सूचना दिल्या. उरण तालुक्याचा सर्वांगिण विकास आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून होत असून, अनेक विकासाची कामे त्यांच्या आमदार निधीमधून केली जात आहेत. त्याअंतर्गत दापोली गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण आमदार महेश बालदी यांच्या 5 लाख स्थानिक आमदार विकास निधीमधून होणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते झाले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे, माजी सदस्या सुजाता जितेकर,  रोशन जितेकर, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, गोरधन डाऊर, माजी उपसरपंच गजानन पाटील, बबन म्हात्रे, बाळाराम म्हात्रे, महेंद्र जितेकर, विष्णू घोपरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply