चेन्नई : वृत्तसंस्थाआयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेच्या चेन्नई सुपकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ कोलमडला आणि मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. बंगळुरुने दिलेले 71 धावांचे माफक आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी सात गडी राखून सहज पूर्ण केले. याच सामन्यात बंगळुरुच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झालेली आहे. फिरकीपटू इम्रान ताहीर, हरभजन सिंह, रवींद्र जडेजा यांच्या जाळ्यात अडकलेला बंगळुरुचा अवघ्या 70 धावांपर्यंत मजल मारू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. पार्थिवने संयमी खेळी करीत संघाकडून सर्वाधिक 29 धावा पटकावल्या चेन्नईकडून हरभजन, ताहीरने प्रत्येकी तीन, जडेजाने दोन; तर ड्वेन ब्राव्होने एक बळी घेतला. बंगळुरुचा एक फलंदाज धावबाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलच्या इतिहासात 75 धावसंख्येखाली तीन वेळा बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. याआधी 2014 आणि 2017 साली बंगळुरुच्या संघावर अशी नामुष्की ओढवली होती. याचसोबत 2008 साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात पहिल्याच सामन्यात बंगळुरुने कोलकात्याविरुद्ध 82 या निचांकी धावसंख्येची नोंद केली होती. त्यानंतर 11 वर्षांनी बंगळुरुने पुन्हा एकदा सलामीच्याच सामन्यात निचांकी धावसंख्या नोंदवली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये विराट कोहलीचा बंगळुरु संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper