Breaking News

नवी मुंबईत होणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

14 मे रोजी आयोजन; पाणथळ संवर्धनासाठी हरितप्रेमी एकवटले

नवी मुंबई ः बातमीदार

जागतिक स्थलांतरीत पक्षी दिवस (डब्ल्यूबीएमडी) 14 मे रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी गट एकत्र आले आहेत. त्या अनुषंगाने शहरात पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. स्थलांतरीत पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे.

जगभरातील स्थलांतरीत पक्षी सध्या धोक्यात आले आहेत. या स्थलांतरीत पक्ष्यांना असलेला धोका कमी करण्यासाठी, त्यांचे परिसंस्थेतील महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज यादृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरते, असे डब्ल्यूबीएमडी वेबसाईटवर म्हटले आहे.   देशातील सर्वाधिक गुलाबी पक्ष्यांचे आगमन होत असल्याने पालिका प्रशासनाने शहराला फ्लेमिंगो सिटीचा शिक्का दिल्याने नवी मुंबई फ्लेमिंगो फेस्टिव्हलचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे.

पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम डीपीएस सरोवरावर होणार असून  डीपीएस (दिल्ली पब्लिक स्कूल) शाळेच्या प्रवेशद्वार क्रमांक पाचवरून ऑडटोरियममधील प्रदर्शनाकडे जाता येईल. हा कार्यक्रम म्हणजे डब्ल्यूबीएमडी ग्लोबल इव्हेंटच्या सूचीचा भाग आहे व त्याची सुरुवात दुपारी 12 वाजता होऊन संध्याकाळी 6 वाजता समारोप होईल. या कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी मोफत असून त्यात सर्वांचे स्वागत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सुमारे 139 वर्षांपासून निसर्ग संशोधनात कार्यरत असलेली बीएनएचएस, नवी मुंबई महानगर पालिका (एनएमएमसी), महाराष्ट्र मँग्रोव्ह फाउंडेशन, गोदरेज मँग्रोव्ह फाऊंडेशन, बाह्य उपक्रम संघटना वँडरींग सोल्स, निकॉन आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांनी या कार्यक्रमाला आपले पाठबळ दर्शवले आहे.

जैवविविधतेच्या दृष्टीने पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशांचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे स्मरण या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला होणार आहे, असे खारघर वेटलँड अँड हिल्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. छायाचित्र प्रदर्शन, कांदळवन आणि पाणथळीवर आधारित शैक्षणिक दिखावे, फ्लेमिंगो नृत्य आणि कला कार्यक्रम हा नवी मुंबई फ्लेमिंगो फेस्टीव्हलच्या धमालीचा भाग असेल अशी माहितीही ज्योती यांनी दिली.

हा महोत्सव केवळ पक्षीप्रेमापुरती मर्यादित नसून धोक्यात असलेल्या परिसंस्थात्मक संतुलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. आपण पाणथळ, दलदलीचे प्रदेश आणि कांदळवनांवर लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे,

-बी. एन. कुमार, प्रमुख, नाटकनेक्ट फाउंडेशन

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (टीसीएफएस)चा भाग म्हणून भरती दरम्यान पक्ष्यांना आश्रय मिळावा याकरिता काही पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन करण्यासाठी उपग्रह पाणथळ व्यवस्थापन आराखडा बीएनएचएस यापूर्वीच मांडला आहे. एनआरआय आणि टीएस चाणक्य या जुळ्या पाणथळ क्षेत्रालगत सध्या सुरू असलेले  बांधकाम म्हणजे अशा उल्लंघनांचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही आहे.

-सुनील अगरवाल, पदाधिकारी, सेव्ह नवी मुंबई एनव्हार्नमेंट फोरम

हा कार्यक्रम आशादायक असून त्यामुळे शहरी विकासाच्या नावाखाली ढासळत चाललेल्या पर्यावरण हानीविषयी नागरिकांत सातत्याने चिंता निर्माण होऊन त्याविषयातील उदासीनता झटकायला हातभार लागेल

-नरेश चंद्रा सिंह, पदाधिकारी, खारघर वेटलँड अँड हिल्स संस्था

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply