Breaking News

एमजीएम हॉस्पिटल येथे अंतिम बिलामध्ये सूट

मी उरणकर प्रतिष्ठानचे आमदार महेश बालदी यांच्याकडून कौतुक

उरण ः बातमीदार

महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलने नवी मुंबई, उरणमधील गरीब व गरजू लोकांसाठी अंतिम बिलात 15 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिष्ठानच्या या पाठपुराव्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी कौतुक केले.

अंतिम बिलात 15 टक्के सूट देण्यात येईल असे अधिकृत पत्र विशाल पाटेकर यांना प्राप्त झाले असून याचा फायदा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणार आहे.

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण या संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याने उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply