अहमदाबाद : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये बुधवार (दि. 24)पासून खेळवला जाणार आहे. हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे स्टेडियम असून, सध्या चर्चेत आहे.
या स्टेडियमवर यापूर्वीही सामने खेळवण्यात आले आहेत, परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशनने या स्टेडियमला आता नवा लूक दिला आहे. या स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल एक लाख 10 हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्यावर आले असताना ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने या स्टेडियमचा दौरा केला होता. याच स्टेडियमवर पंतप्रधान मोदींनी अधिकृतरीत्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे स्वागत केले होते. यापूर्वी ‘अहमदाबाद मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार या स्टेडियमच्या उभारणीसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
या स्टेडियममध्ये चार लॉकर रूम्स आहेत, तसेच आयपीएलमध्ये एका दिवशी होणार्या दोन सामन्यांकडे पाहता हे स्टेडियम तयार करण्यात आले आहे. मुख्य क्रिकेट मैदानाव्यतिरिक्त या ठिकाणी दोन छोटी क्रिकेट ग्राऊंड्सही आहेत.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper