तळा शहरातील विराज टिळक सर्वत्र कौतुक
पाली : प्रतिनिधी
तळा शहरातील विराज टिळक या तरुणाने टाकाऊ वस्तूपासून प्रदुषण विरहीत इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. त्याच्या या जीपची सध्या सर्व चर्चा सुरु आहे.
विराज टिळक याने 70 टक्के टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली असून तिच्या चेसीपासून कलर, सजावट, पेंटिंगदेखील घरीच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबेट मशीन अशी अवघी चार अवजारे वापरून ही जीप तयार करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक फॅमिली जीप बनवण्याचं स्वप्न पाहिलं. फार्महाऊस किंवा मोठे रिसॉर्टमध्ये या गाड्या वापरू शकतो प्रदूषण पण होत नाही आणि इंधनाचीदेखील बचत होते. विराज टिळक याने सांगितले.
विराज टिळक याचा केबल व्यवसाय आहे. त्याने जुन्या काळात वापरण्यात येत असलेली ओपन फॅमिली जीप बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राजू पुजारी या भंगार व्यवसायिकाकडून मोडलेल्या गाड्यांचे पार्ट घेतले. ते पार्ट जोडण्यासाठी वेल्डर असलेल्या ज्ञानेश्वर मोरे या मित्राने मदत केली. मित्र तुषार भौड यांचे आटोमोबाईलचे दुकान आहे. त्यांनी जे लागेल त्या वस्तू पुरविची हमी घेतली. स्टेरिंग, सस्पेन्शन अगदी मनाप्रमाणे मिळाले. दोन प्रयोग फसले आणि तिसरा प्रयोग यशस्वी झाला. पेंटिंग नथुराम करंबे यांनी केले. तसेच या कामात निलेश शिगवण, रुपेश चिले, प्रितेश मेकडे, समीर भौड, गुलशाद, गुड्डू, राहुल गोळे यांचादेखील मोलाचा वाटा असल्याचे विराज टिळक याने सांगितले.
जीपमध्ये चार बॅटरी आहेत. एक इलेक्ट्रिक मोटर आहे. तिला तयार करण्यासाठी साधारण दीड लाख रुपये खर्च आला. एकदा चार्ज केली की, 75 ते 80 किमी जाते. बॅटरी चार्जिंगला सुमारे चार ते पाच तास लागतात. 30 ते 35 रुपयात 80 किमी प्रवास करते. विरोध कमी व्हावा आणि जुन्या जीपला शोभतील म्हणून मोटारसायकचे टायर वापरले आहेत. मागे पुढे पाटे लावून सस्पेन्शनदेखील उत्तम केले आहे. तसेच हँडब्रेक, उताराला अँटीलॉक सिस्टमदेखील आहे. हेडलाईट, पार्किंग लाईट, इंडिकेटर, हॉर्नदेखील आहे. या जीप किंवा इलेक्ट्रिक गाडीमुळे प्रदूषण होत नाही.