Saturday , June 3 2023
Breaking News

विधिज्ञ् नईमा घट्टेंच्या पनवेल कार्यालयाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.

पनवेल न्यायालयात होणार्‍या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना कायदेशीर प्रक्रियेत या कार्यालयाचा उपयोग होईल, असे मत परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. प्रशांत नाईक यांनीदेखील शुभेच्छा पर विचार मांडले.

या वेळी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड प्रभारी सय्यद अकबर, पनवेलचे नगरसेवक मुकीत काझी, भाजपचे इफ्तीकार अत्तार, कैसर दणदणे, उरणच्या माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, रशीद ठाकूर आदी उपस्थित होते. इमरान घट्टे यांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply