Breaking News

खालापुरात महिलेची हत्या, आरोपी 24 तासांत जेरबंद

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील रानसई बोरीची मळशी जंगल भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी आरोपीला 24 तासांत जेरबंद केले आहे.

रानसई बोरीची मळशी जंगल भागात 6 जून रोजी   एका अनोळखी महिलेचा जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी डोक्यास झालेल्या दुखापतीने (कशरव खपर्क्षीीू) मरण असा अभिप्राय दिला असल्याने सदर महिलेचा खुन झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र मृताची ओळख पटविणे अत्यंत कठीण व आव्हानात्मक होते. ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना उंबरे (ता. खालापूर) येथील काळुराम मारूती वाघमारे याने, पत्नी आशा बाघमारे ही मागील 15 ते 20 दिवसापुर्वी कर्नाटक येथील राठोड मुकादम याचे सोबत कोळशाच्या भट्टीकरीता मजूर शोधण्यासाठी वावोशी व रानसई येथे गेली होती, तेव्हापासून ती बेपत्ता आहे, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

यानंतर तो मृतदेह आशा काळुराम वाघमारे हीचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात 10 ते 15 दिवसापुर्वी आशा रानसई आदीवासीवाडीतील हिरामण जाधव याच्या घरी आली होती. ती सुनिल पवार व कुमार बाधे यांना कोळशाच्या भट्टीवर कामाकरीता घेवून जाणार होती. त्याकरीता तीने त्या दोघांना पैसे दिले होते. व लगेच कामावर जाण्यासाठी तगादा लावला सुरू केला होता. मात्र सुनिल पवार याची पत्नी शांता पवार ही लगेच भट्टीवर कामासाठी जाण्यास तयार नसल्याने सुनिल व शांता यांच्यात भांडण झाले. त्या रागातून रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सुनिल पवार हा आशा वाघमारे हिला बोरीची मळशी नावाच्या जंगल भागाकडे घेवून गेला होता. त्यानंतर तो एकटाच घरी आला होता. त्यानंतर तो पत्नी, मुलांना घेवून कोठेतरी निघून गेला असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली. यावरून हा खुन हा सुनिल यानेच केल्याची खात्री झाली.

दरम्यान, खालापूर पोलिसांनी आरोपी सुनिल श्रावण पवार याला हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी सुनील पवार याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश कराड करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply