Breaking News

महाडच्या पूरग्रस्त आंबेडकर महाविद्यालयातील ग्रंथालयाला कपाटांची भेट

पाली : प्रतिनिधी

सह्याद्री मित्रमंडळ रिलायन्स टाऊनशिप नागोठणे यांच्या वतीने महाडच्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन कपाटे प्राचार्यांच्या उपस्थितीत ग्रंथपालांना सुपूर्द केली.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि परिसरात प्रचंड हाहाकार माजला होता. यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. जीव, भौतिक व रसायनशास्त्र प्रयोगशाळा ही पूर्णपणे खराब झाल्या होत्या. हे सर्व दुरुस्त करणे किंवा नव्याने उभारणी करणे यासाठी महाविद्यालयाने समाजातील सर्व घटकांना मदतीचे आवाहन केले होते.

महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक सुरेंद्र वानखेडे यांचे आवाहन त्यांचे बी. एड. कॉलेज मधील मित्र व रयतेचा कैवारीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी सुनील घोलप यांच्या पर्यंत पोहोचले. घोलप सरांनी सह्याद्री मित्रमंडळ रिलायन्स टाऊनशिप नागोठणे, आपले शिक्षक सहकारी व बी. एड. कॉलेज भोर मित्र आदींच्या पर्यंत हे आवाहन पोहचवून रु.18,000 ची मदत गोळा केली आणि दै. रयतेचा कैवारी गुरुगौरव सोहळा महाडच्या कार्यक्रमात दै. रयतेचा कैवारी या डिजिटल शैक्षणिक दैनिकाचे संपादक शाहू भारती सर यांच्या हस्ते सुरेंद्र वानखेडे यांच्याकडे सुपूर्द केली. याच मदतीतून महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन कपाटे खरेदी करून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ती ग्रंथपालांना काल सुपूर्द केली. आपण केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणार्‍या सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply