महाड : प्रतिनिधी
राज्यसभेच्या तिन जागा जिंकून भाजपने इतिहास घडविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष होत असताना महाड, माणगावमध्येही शनिवारी (दि. 11)आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांचा विजय झाला. अत्यंत करेक्ट कार्यक्रम करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना पाणी पाजले. त्याबद्दल महाड येथील भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी सर्वांना पेढे वाटण्यात आले.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदिप ठोंबरे, डॉ. मंजुशा कुद्रीमोती, निलीमा भोसले, रश्मी वाझे, महेश शिंदे, नाना पोरे, निलेश तळवटकर, चंद्रजित पालांडे, राकेश वाघ, अप्पा सोंडकर, तुषार महाजन, धामनसे, विश्वतेज भोसले, करमरकर, जिगेशा बुटाला आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
माणगाव : प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीत तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याबद्दल माणगावातील भाजप कार्यालयाजवळ शनिवारी (दि.11) सकाळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक हे तीन उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्यानंतर माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे आणि तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले उपस्थितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी माणगाव कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
भाजप महिला मोर्चाच्या माणगाव तालुका अध्यक्षा अश्विनी महाडीक, कोकण विभाग किसान मोर्चा महिला अध्यक्षा शर्मिला सत्वे, भटका समाज जिल्हा उपाध्यक्षा मेघा धुमाळ, तालुकाध्यक्षा नीलम काळे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पोलादपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांवर भाजपचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल पोलादपूर येथील भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ फटाके वाजवून शनिवारी (दि. 11) आनंद साजरा केला. भाजपचे शहराध्यक्ष राजा दिक्षित, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन धुमाळ, युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रतिक सुर्वे आणि सोशल मीडिया सेलचे क्षितीज धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
नागोठणे : प्रतिनिधी
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाल्याबद्दल नागोठण्यात शनिवारी (दि. 11) विजयोत्सव साजरा करण्यात आला.
या विजयोत्सवाची सुरुवात भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या कार्यालयातून करण्यात आली. या वेळी नागोठण्यातील वयोवृद्ध निराधार महिला वत्सला वाघमारे यांना वीणा मोदी यांच्या हस्ते साडी व भेटवस्तू देण्यात आल्या. सचिन मोदी यांनी त्यांचा वैद्यकीय खर्च उचलण्याचे मान्य केले.
त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणांबाजी आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाईचे वाटप केले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे, शहराध्यक्ष सचिन मोदी, ज्येष्ठ नेते परशुराम तेलंगे, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, गौतम जैन, प्रियंका पिंपळे,रौफ कडवेकर, विठोबा माळी, तीरथ पोलिसांनी, शेखर गोळे, राजेंद्र देवरे, धनराज धुमाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.