Breaking News

गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे आवश्यक

सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना

पनवेल : प्रतिनिधी

गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेतल्यानंतरच एमटीपी सेंटर्स गर्भपात करू शकणार आहेत, या नियमांचे सर्व मान्यता प्राप्त एमटीपी सेंटर्सनी पालन करावे. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पनवेल महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या. एमटीपी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेंग्नसी क्ट) विषयीची बैठक झाली. सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्यासाठी एमटीपी कायदा करण्यात आला असून या कायद्यातील नव्या बदलानुसार 20 आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी एका आरएमपीची (रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशनर) असणे बंधनकारक असेल. तसेच 20-24 आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी दोन आरएमपी असणे बंधनकारक असेल. 20-24 आठवड्यांपर्यतच्या गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे गरजेचे आहे. या नियमांचे एमटीपी सेंटर्सनी पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालये तसेच सोनोग्राफी सेंटर्समधील शासकीय नियमांचे कठोर अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. या बदलांची माहिती पालिका क्षेत्रातील सर्व एमटीपी सेंटर्सना कळविण्यात येणार आहे. या वेळी माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. अभय शेटे, समिती सदस्य डॉ. महेश मोहीते, कांतीलाल पाडवी, सुनिता शिंदे, प्रियांका पाटील, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply