बाजार जेव्हा तळ गाठतो, त्या परिस्थितीत पाच असे मार्केट व्याप्ती निर्देशक आहेत, जे प्रत्येक सावध गुंतवणूकदाराला माहीत असणे आवश्यक आहे. बाजारातील विश्लेषकांनी असे पाच बाजार व्याप्त निर्देशक सांगितले आहेत, जे गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत सावधगिरीचे संकेत देतात.
मागील आठवड्यात निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं मागील एक वर्षांतील नीचांक नोंदवला. एक वर्षांपूर्वी 18 जून 2021 रोजीचा 15450.9 हा नीचांक मोडीत काढून गेल्या शुक्रवारी निफ्टीनं 15183.4 हा नवा नीचांक नोंदवला. सेन्सेक्सनं देखील 51601 हा नीचांक मोडून नवीन 50921 हा नीचांक नोंदवला. त्याआधी गुरुवारी बाजारानं मोठी पडझड अनुभवली. कारण होतं अमेरिकी मध्यवर्ती फेडरल रिझर्व्हनं त्यांचे व्याजदर पाऊण टक्क्यानं वाढवले. तरीही पुढील जुलै महिन्यातील फेडरल ओपन मीटिंग कमिटीच्या बैठकीत पाऊण टक्क्याने वाढ करण्याऐवजी अर्धा टक्का वाढ करण्यावर विचार केला जाऊ शकतो, या वक्तव्यामुळं त्या दिवशी अमेरिकी शेअर बाजाराचा डाऊ जोन्स निर्देशांक 300 अंशांनी वाढला. मात्र तरीही अमेरिका आर्थिक मंदीच्या आहारी जाईल या भीतिपोटी भारतीय बाजार गुरुवारी चांगलाच आपटला. सहा दिवस सलगपणे भारतीय बाजार रोज पडत आहे. नेहमीच आपल्या बाजारावर अमेरिकी बाजाराचा वरचष्मा पाहायला मिळतो. तिथं झालेली बाजारातील करामत सकाळी आशियाई बाजारावर मोहिनी घालते व नंतर भारतीय बाजार त्या अंमलाखाली नाचताना आढळतो. मागील एक वर्षामध्ये म्हणजे जुलै 2021 पासून ते आतापर्यंत, देशांतर्गत गुंतवणूकदार संस्थांनी (ऊखखी) 3.12 लाख कोटी रुपयांची खरीददारी करूनही आपला बाजार वर्षभरातील नीचांकावर (52 वीक लो) व्यवहार करताना दिसत आहे याचं कारण म्हणजे मागील वर्षभरात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी लावलेला विक्रीचा सपाटा. मागील वर्षभरात त्यांनी विक्री केलेल्या रोख्यांचा आकडा हा 3 लाख 93 हजार कोटी रुपयांवर आहे. त्यामुळं या बाबतीत आपण नक्कीच आत्मनिर्भर नाही आहोत हे उघड आहे.
अशा परिस्थितीत पाच असे मार्केट व्याप्ती निर्देशक जे प्रत्येक सावध गुंतवणूकदाराला माहीत असणे आवश्यक आहे. बाजारातील विश्लेषकांनी असे पाच बाजार व्याप्त निर्देशक सांगितले आहेत जे गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत सावधगिरीचे संकेत देतात.
ढोबळ निर्देशांक : निफ्टी 500 मधील कंपन्यांच्या शेअर्समधील 52-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या समभागांची जास्त संख्या आणि 52-आठवड्यांच्या नीचांक गाठणार्या समभागांची संख्या ही बुल मार्केटचं प्रतिनिधित्व करते तर याच्या उलट बेअर मार्केट सूचित करते. आठवड्यांच्या तुलनेच्या आधारावर, गेल्या आठवड्यात 52-आठवड्याचे उच्चांक/नीचांक चिन्हांकित करणार्या शेअर्सचे सरासरी गुणोत्तर 3:14 होते तर या आठवड्यात, हे प्रमाण 1:34 वर आहे जे बेअर मार्केटच्या बाजूस झुकत आहे. या आधारावर, गेल्या आठवड्यात निफ्टी 500 मधील 125 कंपन्यांच्या शेअर्सनी 52 आठवडी नीचांक नोंदवले तर केवळ 7 कंपन्यांनी (टीव्हीएस मोटर्स, एलजी इक्विपमेंट्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोरोमंडल, वरुण बेव्हरेजेस, हिंदुस्थान एरोनॉटिक्स) 52 आठवडी उच्चांक नोंदवले आहेत.
200-दिवसांची चलत सरासरी : बाजारातील भावनांत्मक परिस्थितीत हा एक महत्त्वाचा तांत्रिक मापक असून सध्या इडए 500 मधील 80 टक्क्यांहून अधिक कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या 200-ऊचअ (मूव्हिंग ऍव्हरेज ऊचअ) च्या खाली ट्रेडिंग करत आहेत. मे 2020 नंतर अशी परिथिती दुसर्यांदा आहे. तेंव्हा 83 टक्के कंपन्यांचे त्यांच्या 200-ऊचअ च्या खाली व्यवहार करत होते. बाजाराचे अभ्यासक म्हणतात की 2008 चे जागतिक आर्थिक संकट किंवा 2013 च्या टॅपर टँट्रम यांसारख्या पूर्वीच्या विक्रीच्या तडाख्यात 200-ऊचअ हे मापन चांगला दर्शक असल्याचं सिद्ध झालं होतं.
क्षेत्रीय भावना सूचक : हा निदर्शक मुळात क्षेत्रीय निर्देशांकांमधील किती कंपन्यांच्या शेअर्स त्यांच्या 200-दिवसांच्या चलत सरासरीच्या वर/खाली व्यवहार करत आहेत ते दर्शवतो. यामुळे कोणती क्षेत्रं त्यांची कामगिरी सुधारत आहेत हे कळण्यास मदत होते. सध्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, फक्त निफ्टी ऑटो त्याच्या 200-ऊचअ निर्देशकाच्या वर आहे. या तुलनेच्या आधारावर, निफ्टी रियल्टी 200-ऊचअ च्या खाली जास्तीत जास्त 20 टक्के घसरला असून निफ्टी मीडिया, निफ्टी फार्मा आणि निफ्टी प्रायव्हेट बँक यांचे घटक सुमारे 10 टक्के मुख्य निर्देशकापेक्षा खाली गेले आहेत. निफ्टी बँकेचे जवळपास 8.5 टक्के घटक देखील त्यांच्या 200-डीएमएच्या खाली गेले आहेत.
निफ्टी आणि 200-ऊचअ प्रीमियम/डिस्काउंट : निफ्टी तिच्या 200-दिवसीय चलत सरासरीच्या किती टक्के वर अथवा खाली व्यवहार करत आहे (प्रीमियम/डिस्काउंट स्प्रेड). आणखी एक विश्वासार्ह प्रमुख इंडिकेटर जो सध्या 11 टक्क्यांच्या स्प्रेड डिस्काउंटवर ट्रेड करत आहे. सोप्या भाषेत, निफ्टी सध्या तिच्या 200-ऊचअ पेक्षा 11 टक्के खाली आहे. बर्याच प्रसंगी, जेव्हा हा निर्देशक 12-15 टक्के स्प्रेडच्या श्रेणीत असतो तेव्हा बाजारात घुमजाव होऊ शकतं.
गोल्डन क्रॉस विरुद्ध डेथ क्रॉस : कोणत्याही शेअरची 50 दिवसांची चलत सरासरी (मागील 50 दिवसांच्या बंद भावाची सरासरी) ही जर त्या शेअरच्या 200 दिवसांच्या चलत सरासरीपेक्षा जास्त असेल तर त्यास गोल्डन क्रॉस म्हणतात आणि याउलटच्या परिस्थितीस डेथ क्रॉस म्हणतात. जेंव्हा निफ्टी 500 मधील कंपन्यांचे शेअर्स हे जास्त प्रमाणात गोल्डन क्रॉस धारण करतात तेंव्हा ढोबळमानानं बाजार हा तेजीमध्ये असतो आणि जेंव्हा जास्त शेअर्स डेथ क्रॉसमध्ये असतात तेंव्हा बाजारात मंदी असते. सध्या निफ्टी 500 पैकी केवळ 25 कंपन्यांचे शेअर्स हे गोल्डन क्रॉस धारण करून आहेत. यावरून सध्या बाजार मंदीच्या विळख्यात आहे हे कळून येतं. परंतु ’जब अंधेरा घना हो तो समझो सूर्योदय निकट हैं’ या उक्तीप्रमाणं जेंव्हा बाजारात मंदी असते तेंव्हाच तेजीची संधी देखील असते.
जिथं विश्वास आहे तिथं आशा आहेच असं आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं आणि आशा जागी होते. त्याचप्रकारे आपल्या देशातील कंपन्यांवर, आपल्या देशावर, अर्थव्यवस्थेवर आपला विश्वास असेल तर हीच वेळ आहे. आपला विश्वास कृतीत आणण्याची म्हणजेच अशा परिस्थतीत चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवायचे अर्थातच त्यांच्या व्यवसाय कृतीवर विश्वास असेल तरच.
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर
परकीय गुंतवणूकदार संस्था व देशी गुंतवणूकदार संस्था तुलनात्मक खरेदी/विक्री
FII Rs. Crores DII Rs. Crores
Date Gross Purchase Gross Sales Net Purchase/ Gross Purchase Gross Sales Net Purchase/
Sales Sales
Jun-22 72,680.74 1,14,769.37 -42,088.63 80,508.66 50,195.81 30,312.85
May-22 1,84,378.97 2,38,671.44 -54,292.47 1,48,569.75 97,734.21 50,835.54
Apr-22 1,47,478.46 1,88,131.17 -40,652.71 1,41,508.11 1,11,638.59 29,869.52
Mar-22 2,03,610.95 2,46,892.26 -43,281.31 1,71,963.59 1,32,286.56 39,677.03
Feb-22 1,36,263.82 1,81,983.89 -45,720.07 1,45,477.51 1,03,393.44 42,084.07
Jan-22 1,41,177.65 1,82,524.00 -41,346.35 1,41,934.87 1,20,006.47 21,928.40
Dec-21 1,46,073.90 1,81,567.49 -35,493.59 1,36,077.68 1,04,846.63 31,231.05
Nov-21 2,04,204.04 2,44,105.96 -39,901.92 1,36,049.58 1,05,489.31 30,560.27
Oct-21 1,85,566.83 2,11,139.02 -25,572.19 1,51,607.74 1,47,136.75 4,470.99
Sep-21 2,17,636.41 2,16,722.64 913.77 1,44,147.33 1,38,198.48 5,948.85
Aug-21 1,75,168.36 1,77,736.88 -2,568.52 1,31,185.18 1,24,290.49 6,894.69
Jul-21 1,25,896.68 1,49,090.07 -23,193.39 1,17,910.10 99,516.18 18,393.92
Total -3,93,197.38 3,12,207.18