Breaking News

मांडवा येथील कुस्ती स्पर्धा रद्द

दीडशे वर्षांची परंपरा खंडित

अलिबाग : प्रतिनिधी

दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनार्‍यावर होणारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. यंदा ही स्पर्धा रद्द कराण्यात आल्यामुळे दीडशे वर्षांची कुस्ती स्पर्धेची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. मांडवा ग्रामस्थ आणि टाकदेवी क्रीडा मंडळ  मांडवा यांच्यातर्फे दरवर्षी मांडवा समुद्रकिनार्‍यावर कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधील नामांकित मल्ल सहभागी होतात. यंदा 3 ऑगस्ट रोजी ही कुस्ती स्पर्धा होणार होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला तसेच संसर्ग रोखण्यासाठी शासनाने अनेक नियम लागू केले. त्याच पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा आजोजित करण्यस बंदी घातली आहे. शासनाच्या  आदेशानुसार यंदा ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply