Breaking News

खारघरमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्ती करीत खारघरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 8) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर करण्यात आला. यामध्ये शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणासह चार कोटी 94 लाख 52 हजार रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि उद्यानांमधील कामांचा समावेश आहे. भाजप नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले आहे.
भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे महापालिका क्षेत्रात सुरू आहेत. अशाच प्रकारे खारघर गाव स्मार्ट होण्यासाठी 11 कोटी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी चार कोटी 94 लाख 52 हजार रुपयांच्या कामांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि रस्ते काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. याचबरोबर महापालिकेमार्फत करण्यात येणार्‍या खारघर शहरातील उद्यानांमधील कामांचे भूमिपूजन व नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या भूमिपूजन समारंभास भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महापालिका प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, जिल्हा चटणीस चौधरी, उपाध्यक्ष रमेश खडकर, साधना पवार, वासुदेव पाटील, नामदेव पाटील, समीर कदम, नवनीत मारू, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, अश्विनी भुवड, वसंत पाटील, वसंत भगत, पंढरीनाथ भगत, बाळकृष्ण भगत, दत्तात्रेय खडकर, नारायण फडके, रमेश भगत, प्रदीप पाटील, पोसू पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील, सचिन वास्कर, आशा भगत, अलका भगत, वैजयंती भगत, आशा पळसकर, अलका पळसकर, मनीषा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी खारघर रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पनवेल महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. पिण्याच्या पाण्यापासून अन्य वेगवगेळ्या सुविधा सगळ्यांना मिळाल्या पाहिजे यासाठी महापालिका पाठपुरावा करीत आहे याचा अभिमान असून त्यामुळे अधिकाधिक वेगाने सर्व कामे होत आहेत, मात्र विकास करत असताना सिडकोकडून प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पनवेल महापलिका क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न, सर्व्हीस चार्जेज आणि डबल टॅक्स या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर या समस्यांमधून सर्व पनवेलवासीयांची सुटका करून घेणे आणि पनवेल महानगराला चांगला उन्नत असा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply