पेण : प्रतिनिधी
जेएसडब्ल्यू कंपनीत कामाला लावते तसेच स्क्रॅपचा ठेका मिळवून देते असे सांगून पेणमधील एका महिलेने अनेकांना 29 लाख रुपये 79 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी अजय पाटील, रा.300 श्रितेज फ्लॅट क्र 140/09 लाईन पनवेल तसेच इतर उमेदवारांकडून महिला आरोपी प्रविणा सावंत यांचे पेण येथील रुम नं.9 गुरुकृपा सेासायटी आर.टी.ओ जवळ पेण ता.पेण.जि.रायगड येथे आरोपी व आरोपी नं.2 अतुल मांडवकर यांनी आपसात संगनमत करुन जेएसडब्ल्यु कंपणीत नोकरीला लावतो असे सांगुन 20 जानेवारी 2022 ते 28 एप्रिल 2022 दरम्यान दरम्यान वेळोवेळी प्रत्येकी रू 30 हजार ते 1 लाख 20 हजार प्रमाणे वेगवेगळी रक्कम घेउन सर्व उमेद्वारांकडुन जवळजवळ 29 लाख 79 हजार रुपये तसेच फिर्यादी यांना कंपनीत स्क्रॅप उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट देते असे सांगुन त्याच्याकडुन 2 लाख रुपये घेवुन फिर्यादी यांना कोणतेही कॉन्ट्रॅक्ट दिले नाही तसेच कोणत्याही उमेदवारास नोकरी ना देता त्यांचेकडुन घेतलेली रक्कम परत न करता त्यांची सर्वांची फसवणुक केली.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 154/2022 भा.दं.वि. कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे हे करीत आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …